महाराष्ट्रराजकीय

काँग्रेसच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचवले, या हिरव्या झेंड्याला उत्तर द्यायला उत्तर प्रदेश वरून खास योगी आदित्यनाथ आलेत

ओएसीच्या हातात हात घालून प्रणिती शिंदे आणि तिच्या पप्पांनी इथल्या हिंदूंना संपवायची सुपारी घेतली : राम सातपुते

सोलापूर : प्रतिनिधी

भाजप मित्र पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ कर्णिक नगर येथील मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती. यावेळी भाजप लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी धडाकेबाज भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले.

राम सातपुते यांचे भाषण जशे आहे तसे..

काँग्रेसच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचवले, या हिरव्या झेंड्याला उत्तर द्यायला उत्तर प्रदेश वरून खास योगी आदित्यनाथ आलेत. मंदिरा वरचा कळस आणि दारातली तुळस सुरक्षित ठेवायचे असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. ओएसीच्या हातात हात घालून प्रणिती शिंदे आणि तिच्या पप्पांनी इथल्या हिंदूंना संपवायची सुपारी घेतली आहे. श्रीरामांची भूमी असणाऱ्या राज्यातून योगी आदित्यनाथ येत आहेत योगींच्या स्वागतासाठी आपण मोठ्या संख्येने आला ही विजयाची नांदी आहे. उद्धव ठाकरे एमआयएमच्या लोकांना हात घालून चिल्ड्रन पार्कमध्ये सभा झाली यांची सभा बाल मैदानावर होऊ शकते हे सोलापूरकरांनी ओळखला आहे.

काशी की कला जाती, मथुरा मे मज्जित बस्ती, अगर छत्रपती शिवाजी महाराज ना होते, तो सबकी सुन्नत होती. ओबीसीच डुक्कर आणि हे सगळे एक झालेत यांना वेळेवरच उत्तर द्यायची वेळ आली आहे. गणपती मंदिर, हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे अजेंडे राबवण्यासाठी लँड जिहाज सुरू केला आहे याला उत्तर देणार ना.? ही निवडणूक राम सातपुते विरोधात प्रणिती शिंदे अशी नाही ही निवडणूक धर्म वाचवण्याची आहे. धर्म राहिला नाही तर आपल अस्तित्व शून्य होईल त्यामुळे विनंती आहे या सोलापूरमध्ये लव्ह जिहाद च्या नावाखाली आपल्या अनेक बहिणींना बळी पाडले जात आहे या विरोधातली ही निवडणूक आहे. ही निवडणूक साखर पेठेला शक्करपेठ केली गेली आहे या विरोधातील ही लढाई आहे.

एम आय एम आणि काँग्रेस एक झाले आहेत जो ओवेसी पंधरा मिनिटे द्या मी इथून हिंदूंचा नामोनिशान मिटवून टाकतो अशा ओवेसींच्या हातात हात घालून प्रणिती आणि त्यांच्या पप्पांनी इथल्या हिंदूंना संपवण्याची सुपारी घेतली आहे. त्यामुळे यांच्याविरोधात बोलावं लागेल आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे भगव्यासाठी लढणारी निवडणूक आहे. उमेदवारी फॉर्म भरताना आम्ही हातात भगवा झेंडा घेतला भाजपचा झेंडा घेतला परंतु विरोधकांनी काँग्रेसच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचवले या हिरव्या झेंड्याला उत्तर द्यायला उत्तर प्रदेश वरून योगी आदित्यनाथ आलेत.

या देशात सर्वोच्च काय असेल तर देश आहे उत्तर प्रदेश मध्ये दृष्टीकरण करणाऱ्या काँग्रेसचा धडा शिकवण्याचं काम योगिनी केलं. मदरशांना दिला जाणार बेकायदेशीर अनुदान बंद करण्याचं काम योगिजीनी केलं. आपल्या गोमातेला कापल जायचं या सुशीलकुमार शिंदेने मुख्यमंत्री असताना सोलापुरातील कत्तलखान्याला प्रोत्साहन देण्याचे काम केलं. हि निवडणूक आपला धर्म वाचवणारी निवडणूक आहे. आपल्या शंभर टक्के मतदान झालं पाहिजे. आपल्या कॉलनीतील गल्लीतील प्रत्येकाला मतदान करण्यास सांगा. जर आपण आता चुकलो तर धर्म आपल्याला माफ करणार नाही. समोरचा उमेदवार म्हणतो लेक लेक सुरू आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या घरातली लेक जर या जहाद्यांपासून वाचवायची असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. येत्या काळात आपल्या सर्वांना मिळून पूर्ण ताकतीने उभाराव लागेल भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या, जो भगवा वारकरी आमचा खांद्यावर घेऊन येतो, जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी फडकवला, जो भगवा अर्जुनाच्या रथाला होता, जो भगवा आमच्या जय सिद्धेश्वर महाराजांच्या अंगावर आहे त्याला आतंकवाद म्हणायचं का.? या दरभद्र शिंदे ने केले त्याच्या विरोधात ही निवडणूक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!