ते वक्तव्य प्रणिती शिंदेच्या येणार अंगलट, चौकशी करा युवा मोर्चाची पोलिसांकडे मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
नुकतेच सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा वर आरोप करताना म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस व भाजपा लोकसभा निवडणुकी दरम्यान सोलापूरात दंगल घडविणार होते. या वक्तव्या संबंधी भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा प्रदेश पदाधिकऱ्यानी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप हे राजकीय स्टन्ट बाजी असून, प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे माहीत होते तर मग त्याचवेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांना त्यांनी का भेटले नाही.?
याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री व भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून सोलापूरातील शांतता बिघडविण्याचे काम प्रणिती शिंदे या अशा प्रकारे वक्तव्य करून करत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपातीचे राजकारण करून व जनतेची दिशाभूल करून मत मिळविण्याचा महाविकास आघाडी व काँग्रेसचा हा आटापिटा दिसत आहे. असा आरोप भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केला.
याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजप OBC आघाडीचे यतीराज होनमाने यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली व काँग्रेसने निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून व खोटे बोलून मते मिळवली व तोच रेटा त्यांचा निवडणूक झाली तरी सुरू असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी भाजप SC मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने, भाजप युवा मोर्चा मध्य पूर्व मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी, भाजयुमोचे अक्षय कोथिंबीरे, ओंकार होमकर, विशाल बनसोडे पदाधिकारी उपस्थित होते.