ट्रॅफिक पोलिसाला दोघांकडून मारहाण

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा मार्ग बंद असल्याच्या कारणातून दोघांनी शहर वाहतूक शाखेतील पोलिसाला मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री ८:१० वाजण्याच्या सुमारास कल्पना कॉर्नरजवळ घडेला.
पोलिस नाईक रविराज श्याम काळे (नेमणूक वाहतूक शाखा) असे मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव आहे. यातील जखमी रविराज काळे हे हवालदार कोकरे यांच्यासह कल्पना कॉर्नर येथे ड्यूटी करीत होते. दुचाकीवरून दोघे तेथे आले. दोघांना शिवाजी चौकाकडे जाणारा रस्ता बॅरिकेट लावून बंद करण्यात आल्याची माहिती काळे यांनी दिली. त्यावेळी (क्र.एमएच-१३ बीएस-०२७८) या क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रथमेश युवराज जेटीथोर व बाबासाहेब युवराज जेटीथोर या दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान प्रथमेश याने फिर्यादीच्या नावाचे नेमप्लेट व सेवेची पदक तोडले. तर बाबासाहेब याने रेडीच्या अंगावरील कपड्याचे बटण तोडले. तसेच कॉलर पकडून धक्काबुक्की केली. यानंतर मारहाण केली.