
सोलापूर : प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील शेळगाव आर गावात सुरू होत असलेल्या ऑर्केस्ट्रा बार व सांस्कृतिक कला केंद्राचे काम तात्काळ थांबवून परवाना रदद् करावा. अशी मागणी ग्रामपंचायत शेळगांव (आर), शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळ, हेमूजी चंदिले कनिष्ठ महाविद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधिकारी आणि प्रशासनाला निवेदन देत करण्यात आले.
सुमारे ५ ते ७ हजाराच्या आसपास लोकसंख्या आणि धार्मिक, शैक्षणिक परंपरा असणाऱ्या शेळगांव (आर) गावात महाविदयालय परिसरात ‘हॉटेल संकेत ढाबा’ या ठिकाणी सुरू होत असलेल्या ऑर्केस्ट्रा बार अगर सांस्कृतिक कला केंद्रामुळे गावचे आरोग्य बिघडून सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता नसून परवान्या बाबत ग्रामपंचायतीने कसल्याही प्रकारचा ठराव अथवा ना हरकत दिलेली नाही.
तरी भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी सदर ठिकाण सील करून परवाना रद्द करण्यासाठी तात्काळ आदेश व्हावेत. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने योग्य ती दिशा ठरवून कायदेशीर सनदशीर मार्गाने भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शेळगाव आर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.