“रात्रीस खेळ चाले”, माजी आमदाराच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक, उत्तर काँग्रेसला सोडा..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघ मागील दोन टर्म प्रभावा नंतर काँग्रेसने यंदाच्या वर्षी प्रणिती शिंदे यांच्या रूपाने विजयश्री खेचत आपला खासदार निवडून आणला. सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार होत आहे.
त्यातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस आहे काँग्रेसचे आमदार निवडून येत या भागात विकास कामे केली आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा अशी मागणी शहर उत्तर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान गुरुवारी रात्री माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी सभापती सुनील रसाळे, सुदीप चाकोते, अशोक कलशेट्टी, हेमा चिंचोळकर, संजय शिंदे, दत्तू बंदपट्टे, एन के क्षिरसागर, चक्रपाणी गज्जम, पुरुषोत्तम श्रीगादी, वीणा देवकlते, भारती इप्पलपल्ली, नुरअहमद नालवार यांची उपस्थिती होती.
विश्वनाथ चाकोते यांनी मी उमेदवारी साठी इच्छुक नाही पण पक्षाने दिलेल्या उमेदवाराला आमदार करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत रसाळे यांनी शहर उत्तर हा काँग्रेसचा आहे, मग हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला पाहिजे अशी मागणी केली. या बैठकीत उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी उत्तर हा काँग्रेसला मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून घेऊन येथून काँग्रेसचा आमदार विजयी करू असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
शहर उत्तर मधून सुदीप चाकोते, सुनील रसाळे, राजन कामत, यांची सध्या तरी नावे चर्चेत आहेत. काल रात्री अचानक माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या निवासस्थानी शहर उत्तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.