देख लेना आँखोसे.. हम आयेंगे लाखोंसे.. असे म्हणत रामा साठी धावली सिता, सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मतदान करा : संस्कृती राम सातपुते
संस्कृती सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या विविध योजनांचे २५० लाभार्थी महिलांची घेतली भेटी, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल यांचे उत्कृष्ट नियोजन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेच्या भाजप आणि महायुतीच्या उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र -९ दाजीपेठ नागनाथ मंदिर मठ येथे सौ संस्कृती राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या विविध योजनांचे २५० लाभार्थी महिला भेटीसाठी जमल्या होत्या. लाभार्थी महिलांचा हस्ते सौ संस्कृती राम सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.
मोदीजींमु़ळे आम्हाला हक्काचं घर मिळालं, इतकंच काय, त्या घराच्या आम्ही मालकीनही आहोत. असे अनेक योजनांचे लाभार्थी महिला आपल्या कुटुंबात झालेला प्रगती आणि देशात झालेला विकास हे सांगताना या भगिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, अभिमान दिसत होता. महायुती आणि मित्र पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी संस्कृती राम सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.
बैठकीचे नियोजन प्रभाग क्र.9 चे माजी नगरसेवक मेघनाथ येमूल यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले. या बैठकीला भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, महिला मोर्चा अध्यक्ष सौ विजयाताई वड्डेपल्ली, शहर चिटणीस सावित्रा पल्लाटी, विमल पुठ्ठा, मध्यपूर्व मंडळाच्या महिला अध्यक्ष लक्ष्मी बदलापुरे, नगरसेविका सौ राधिका पोसा, सौ रामेश्वरी बिर्रू, शहर चिटणीस सौ सावित्रा पल्लाटी, नागेश सरगम, आनंद बिर्रू, दत्तात्रय पोसा, विश्वनाथ बदलापुरे, संतोष चन्ना पंतलु, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष श्रीनिवास जोगी, प्रकाश गाजुल, प्रसाद पुलगम, अनिल व्हनमाने, हरी सोमा, विजय महिंद्रकर, श्रीनिवास साई, श्रीनिवास जोगी, अंबादास कनकी, श्रीनिवास द्यावरकोंडा, महेश कोडम, सचिन महिंद्रकर, श्रीकांत घनाते, आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक मेघनाथ येमूल यांच्या मित्र परिवारचे सहकार्य लाभले.