आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने नंदीध्वज मार्गावर केली विद्युत रोषणाई, भक्तगणांची जिंकली मने

सोलापूर : प्रतिनिधी
12 जानेवारी 2025 रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आपल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणूक मार्गावर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने पुर्व मंगळवार पेठ पोलीस चौकी पासून ते मन्मथ स्वामी मंदिरा पर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
महादेव गल्ली परिसरात नंदीध्वज आगमन झाल्यावर नंदी ध्वजाचे मानकरी हिरेहब्बू यांच्या शुभहस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून विद्युत रोषणाई चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, देविदास चेळेकर, सुहास छंचुरे, हर्षलभाई कोठारी, चंद्रकांत शहा, डॉ महावीर शास्त्री, योगेश कुंदुर, अनिल जमगे, शिवानंद सावळगी, महेश नळे, वेदांत तालिकोटी, अप्पासाहेब जिगजेणी, प्रथमेश गावडे, सुरज छंचुरे, महेश नागणसुरे, योगिराज आरळीमार,हे उपस्थित होते.
या प्रसंगी आनंद तालिकोटी यांनी म्हणाले, गेल्या सहा वर्षांपासून मानाच्या सातही काट्यांचे आगमन झाल्यानंतर शिवानुभव मंगल कार्यातील मनमत स्वामी या परिसरामध्ये विद्युत रोषणाई केले जाते व तसेच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते व आलेल्या सर्व भक्तांना सुगंधी दुधाचे वाटप देखील करून एक सामाजिक बांधिलकी ही संघटना जोपासत आहे.
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी करण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे भक्तगणात आस्था संस्थेच्या सामाजिक कार्याविषयी चर्चा सुरू होती यासह भक्तगणांची मने संस्थेने जिंकल्याचेही भक्तांमधून बोलले जात होते.