सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
टाकळी येथील शिंदे कुटुंबीयांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन, श्री मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ ट्रस्टच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांचा सन्मान

सोलापूर : प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या टाकळी येथील निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले, यावेळी काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनीलमामा रसाळे, श्री मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, ट्रस्टी कार्यवाह संजय शिंदे, पत्रकार विशाल भांगे,
माजी उत्सव अध्यक्ष अशोक कलशेट्टी, मध्यवर्ती उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष चक्रपाणि गज्जम, सदस्य पुरुषोत्तम श्रीगादी, प्रसिद्धीप्रमुख शिवानंद येरटे, आदी उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त मानाचा पुष्पहार, शाल, आणि पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.