संस्कारांच्या उणिवामुळे मुले व्यसनाधीन होतात, प्रत्येक कुटुंबात संवाद प्रबोधन करण्याची नितांत गरज : मोहन भागवत

सोलापूर : प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर देवस्थान अध्यक्ष धर्मराज काडादी सीए सुनील इंगळे असीम सिंदगी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्वागत केले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर पायावर पाणी घेऊन शिवयोग समाधी कडे दर्शनासाठी गेले. गुरुराज हब्बू, राजेश हब्बू, यांनी शिवयोग समाधीची माहिती दिली. मुख्य गाभाऱ्यात श्री.सिद्धेश्वर महाराजांची आरती केली गेली धर्मराज काडादी, सुनील इंगळे, शिवशंकर, अमित, चन्नवीर, राजेश, गुरुराज या सर्व हब्बू पुजारी मंडळ यांच्या वतीने प्रतिमा पुष्पहार देऊन सन्मानित केले गेले.
मुख्य मंदिरात सरसंचालकांनी पूजा केल्यानंतर देवस्थान कार्यालयात देवस्थान अध्यक्ष व पंच कमिटीचे पंच यांच्या उपस्थितीत स्वागत सत्कार करण्यात आला देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज यांनी देवस्थानचे उपक्रम तसेच ग्रामदैवताची यात्रा सगळी इत्यंभूत माहिती सरसंघचालकांना सांगितली. देवस्थानाध्यक्ष व पंच कमिटीच्या सत्काराला संबोधित करताना “12 व्या शतका पासून सातत्याने चालणाऱ्या या परंपरेमध्ये मंदिरेही समाजाची केंद्र आहेत.
या परंपरेच्या निर्वहन मध्ये श्रद्धेची, संस्काराची शिदोरी पिढी दर पिढी सातत्याने मिळत आल्याने समाज उत्तम रित्या जगत आला आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये पाश्चिमात संस्कृतीचा प्रभाव कुटुंब संस्थेला बाधक ठरत आहे, कमी वयात किशोरवयीन मुलांना ड्रगचे व्यसन सेवन करण्याच्या घटना उल्लेख करत त्यांनी सुशिक्षित कुटुंबातील संस्काराच्या उणीवामुळे अशा प्रवृत्ती सर्वसाधारण पणे सगळीकडे दिसत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि हे संकट दूर करायचा असेल तर अशा परंपरेने आलेल्या श्रद्धा आणि संस्कारांना घेऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे तसेच अश्या प्रत्येक कुटुंबात संवाद घडवून आणत कुटुंब प्रबोधन करण्याची नितांत गरज असल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले आहे आहे.
“आत्मनो मोक्षार्थं जगद्धितायच”
12 व्या शतकापासून चालत आलेली मंगलकारी परंपरा स्वतःच्या अथक परिश्रमाने चालती ठेवणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व श्री सिद्धरामेश्वर कृपा करोन उत्तरोत्तर प्रगतीच्या हार्दिक शुभकामना अशी भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
यावेळी पंचकमिटी सदस्य बाळासाहेब भोगडे, गुरुराज माळग, ऍड.RS पाटील नीलकंठ, अप्पा कोणापुरे, विश्वनाथ लब्बा, महादेव चाकोते, गंगाधर गावसने, राहुल पावले, शिवानंद कल्लूरकर उपस्थित होते.