ॲड शकील नाईकवाडी हल्ल्यातील मुख्य आरोपी नागराज स्वामी यास अटकपूर्व जामीन मंजूर : ॲड रविराज सरवदे

सोलापूर : प्रतिनिधी
दि २७ जून २०२४ रोजी मार्केट यार्ड परिसरात ॲड शकिल नाईकवाडी यांच्या भावाचे चायनिजचे दुकान आहे. सदर दुकानात यातील आरोपी विशाल चंदनशिवे, महादेव बिराजदार व नागराज स्वामी यांनी कुत्र्याच्या कारणावरुन यातील ॲड शकिल नाईकवाडी यांच्या भावा सोबत भांडण केले व त्यामध्ये ॲड शकिल नाईकवाडी हे मध्ये गेले असता यातील आरोपीने त्यांना मारहाण केले आहे व त्यामध्ये ॲड शकिल नाईकवाडी हे गंभीर जखमी झालेले होते. त्यानंतर यातील आरोपीविरुध्द जेल रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाले व ते फिर्यादी वकील असल्यामुळे सोलापूर बार असोशिएशनने वकीलपत्र न घेण्याबाबत ठराव झाला.
परंतु यातील आरोपीचे वकील ॲड रविराज सरवदे यांनी वकीलपत्र घेतले व यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली व उर्वरित आरोपी नामे नागराज स्वामी यांस अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून याचा अटकपूर्व जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला व सदरचा जामीन अर्ज मे. राणे साहेब यांच्या कोर्टात सुनावणी करीता ठेवण्यात आले.
यामध्ये आरोपीच्या वतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन यातील आरोपी नागराज स्वामी यांस मे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला. यांत आरोपीच्या वतीने ॲड रविराज सरवदे व ॲड कपिल चलवादी यांनी काम पाहिले.