परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मनिष काळजे धावले, कामगारांसोबत अखेरपर्यंत राहणार काळजेनी दिला शब्द

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील बदली व रोजंदारी सेवकांना मागील सेवा ग्राह्य धरुन त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्त वेतन व उपदान) नियम १९८२ नुसार जुनी पेंन्शन योजना लागू करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना दिले.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेले आहेत. सदर सेवका १९८७ ते १९९०, १९९२, २००० मध्ये निवड समितीमार्फत सेवाज्येष्ठ यादी तयार करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे त्या सेवाज्येष्ठ यादीप्रमाणे यादीतील सेवकांना कायम करण्यात आलेले होते. (नियुक देण्यात आलेली होती.) परंतु महाराष्ट्र शासन निर्णय क्र.अमिया १००५/१२६ सेवा, दि.३१/१०/२००५ अन्वये महाराष्ट्र शासन कि विभागाकडून दि.०१/११/२००५ किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदान पेंन्शन योजना लागू करण्यात आलेली होती.
परंत सदर बदली सेवक हे १९९५ पुर्व सेवेत कार्यरत होते. त्या सेवकांन दि.०१/११/२००५ नंतर परिवहन उपक्रमाकडील रिक्त पदावर नियुक्ती केलेल्या अशा सेवकांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन १९८२ चा नियम लागू केलेला नाही व सो.म.पा. यांनी सन २००३ पासून परिवहन उपक्रमा कडील कोणतेही पद भरु नये महासभे मध्ये ठरा केलेला होता.
तो सदरचा ठरावावरील सन २००९ मध्ये सदरची बंदी उठविण्यात आलेली असल्याने त्यानंतर परिवहन कडील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना व अधिकारी वर्गांना कायम नियुक्ती देण्यात आली होते त्याप्रमाणे सदरचे सेवक हे सन २००९ ते २०१५ या कालावधीमध् त्यांना सेवेत कायम केलेले आहे. तद्नंतर सेवानिवृत्त सेवकांची पेंन्शन मागणी संदर्भात सातत्याने मागणी असल्याने, सदर मागणीनुसा आयुक्त व परिवहन व्यवस्थापक यांनी पेंन्शन संदर्भातील विभागास योग्य त्या सूचना करून कामगारांच्या थकीत देयके तात्काळ मिळावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी याबाबतचे निवेदन पालिका आयुक्त यांना दिले यावेळी परिवारांचे निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.