महाराष्ट्रराजकीयसामाजिकसोलापूर
शिंदे-काळे-पवार यांनी केला एकत्र जल्लोष, हा विजय महायुतीचा लाडक्या बहिणीचा असे म्हणत एकमेकांना भरवले पेढे

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महायुतीला मिळालेले यश आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील महायुतीने जिंकलेल्या जागा याचा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने एकत्र येत करण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.
खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल हा खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राष्ट्रवादी कुणाची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे महायुतीला मिळालेले यश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे काम यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा ठाम विश्वास युतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
.