शिवसेना स्टाईल ला भाजप स्टाईलने उत्तर, ये पब्लिक हैं सब जानती हैं, शिवसेनेचे चव्हाट्यावर आलेले प्रश्न सोडवा : वैशाली गुंड-विभुते

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर काही दिवसापूर्वी शांतीसागर मंगल कार्यालयात भाजप पक्षाच्या वतीनं चिंतन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजपच्या काही युवा कार्यकर्त्यांनी आपल्यालाही मत मांडायचा आहे असं म्हणत गोंधळ घातला होता, भाजप पक्ष हा संस्कृत म्हणून परिचित आहे भाजप पक्षात देखील गोंधळ होतो यावरून अनेकांनी टीका केली.
यावर चिंतन बैठकीतील प्रकार चिंतनिय, विचारधारा जनाधार संपलेली उरलेली भाजपा आगामी विधानसभेत पूर्णता संपेल अशी घनाघाती टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेते अस्मिता गायकवाड यांनी शिवसेना स्टाईलने केली.
या टिकेस उत्तरं देताना भाजपा प्रदेश महिला चिटणीस वैशाली गुंड-विभुते म्हणाल्या, आमच्या पक्षात चिंतन बैठका तरी होतात. पक्ष एक संघ आहे. विचारधारा तत्त्वनिष्ठता असलेला भारतीय जनता पक्ष. पक्षांमध्ये चर्चा होते, वाद विवाद होतात, आरोप प्रत्यारोप होतात म्हणजे सजीव तेच लक्षण आहे. जनाधार आहे आपण संघटन कौशल्य वाढवा व नवनवीन महिलांना युवकांना संधी द्यावी, पक्ष वाढीसाठी काम करावे. अभ्यासू व्यक्तिमत्व आहात विचारांची प्रगल्भता वाढवा. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्या पक्षाची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहोचवा.
हिंदुरुदय सम्राटच्या या विचारांची पायमल्ली करणाऱ्यांनी आम्हाला किंवा आमच्या नेत्यांवर बोलू नये. भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये युती असताना काम केलेले कार्यकर्ते आहोत आम्ही. हिंदुरुदय सम्राट बद्दल निदान आदर आहे. स्वतःच्या पक्षातली वाताहत पहावी. चिंता करावे, आमचे नेते सक्षम आहेत. आमची विचारधारा बलाढ्य विचारांची आहे. आमच्या पक्षाला इतिहास आहे. कुटुंबातले प्रश्न सोडवायला आमच्याकडे बैठका तरी होतात. तुमच्या चव्हाट्यावर आलेले प्रश्न सोडवा. तुम्ही ही निवडणूक जिंकलात खरे पण वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या सोबत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला उरला सुराला प्रत्येक सच्चा शिवसैनिक हरला.
हा द्वेष हिंदू तुमचे हक्क हिसकवणार ही भिती दाखवणारा होता. संविधान बदलून तुमचे हाल होतील असा खोटा संदेश पसरणारा होता. गुलालाचा रंगाला द्वेषाचा वास होता, हे महाराष्ट्राची जनता विसरणार नाही आणि वर बाळासाहेब सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. ये पब्लिक हैं सब जानती हैं असे म्हणत भाजपा प्रदेश महिला चिटणीस वैशाली गुंड-विभुते यांनी भाजपा स्टाईलने सडेतोड उत्तर दिले.
आगामी काळात भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील वाद वाढत जाणार की मिटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.