सदर बझार पोलीस ठाणे कडील गहाळ दाखल 20 मोबाईल मालकांना परत, मोबाईल धारकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे मानले आभार

सोलापूर : प्रतिनिधी
सदर बझार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये, तसेच मोठया प्रमाणात बाजारपेठा आहेत, याकरिता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात, त्यांच्या कामाच्या ओघात, तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गहाळ झालेले आहेत. सदरचे मोबाईलचा शोध घेण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांचे आदेशान्वये सदर बझार पोलीस ठाणेच्या पो.हे. कॉ/421 रफिक इनामदार यांना आदेशीत केले होते.
त्याप्रमाणे वपोनि अजित लकडे यांच्या मार्गदर्शना खाली पोहेकों/42 रफिक इनामदार पोहेकॉ/1190 मुजावर, व सायबर क्रामचे पोहेकों/601 प्रकाश गायकवाड व पोकों/अर्जुन गायकवाड झोन ऑफीस यांनी अथक परिश्रम घेवुन तसेच तांत्रिक माहितीचे आधारे सदर बझार पोलीस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले एकूण 2,97,000/- रुपयांचे एकूण 20 मोबाईल जप्त करुन उत्तमप्रकारे कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी डॉ. एम. राजकुमार पोलीस आयुक्त, विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), डॉ.दिपाली काळे- पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा., अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-२, यांचे मार्गदर्शनाखाली अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सदर बझार पोलीस स्टेशन, बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोह/४२१ रफिक इनामदार, पोहेकॉ/११९० मुजावर, पोहेकॉ/६०१ प्रकाश गायकवाड, पोकों/अर्जुन गायकवाड यांनी केली आहे.