सोलापूर

MPDA.. चार गंभीर गुन्हे असलेल्या अजय जाधव यांची येरवड्यात रवानगी

एमपीडीए अधिनियम १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश

सोलापूर : प्रतिनिधी

शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अजय रघुनाथ जाधव, वय ४०, रा. शामानगर, झोपडपट्टी, सोलापूर याच्यावर शहर पोलिस आयुक्तालयाने ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करत त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी केली.

 

जाधव याच्यावर मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणे आदी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. शहरातील व्यापारी व सामान्य लोकांमध्ये दहशत होती. त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत. अजय जाधव याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी २०२१ व २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवले आहे. त्यामुळे २ मे २०२४ रोजी त्याच्यावर एमपीडीए अधिनियम १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!