वैशाख बुद्ध पौर्णिमा सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी, तालीम परीसरात प्रसाद वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
आवसे वस्ती आंबराई, सोलापूर येथे वैशाख पौर्णिमे निमित्त सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने प्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंडळाचे प्रमुख विनोद वाघमारे, अध्यक्ष अक्षय वाघमारे, कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, पत्रकार रवी ढोबळे, यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करण्यात आला.
यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्व भारतीय बौद्ध बांधवांना व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर विभागातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, पंचशील देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. उपस्थित असलेल्या लहान मुलांना व नागरिकांना मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी मंडळातील सभासद लहान थोर मंडळी व तसेच महिलांचा सहभाग मोठा होता यावेळी प्रत्येक महिलाने मेणबत्ती लावून दर्शन घेतले व तसेच असंख्य मेणबत्ती लावण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी उत्सव अध्यक्ष अक्षय वाघमारे, स्वप्निल सुरवसे, विश्वजीत कसबे, प्रशांत उघडे,
रोहित ओहोळ, शांतीसागर वाघमारे, उदय वाघमारे, जॉन शिखरे, नितीन वाघमारे, गुलाब शेख, किशोर लोंढे, समाधान लोंढे, योगेश जयराज, ओहोळ सोनवणे, विकास खळसोडे, अमोल वाघमारे, सचिन गाडे, अक्षय नडगम, बंटी ओहोळ, सुशील माळशिकारे, सुदर्शन ओहोळ, आदी उपस्थिती होते.