काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागमहिला व नागरिकांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ महावीर चौक , अशोक नगर , बापूजी हाऊसिंग सोसायटी आधी परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टीही करण्यात आली. महिला व नागरिकांनी चेतन नरोटे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीमध्ये ही पदयात्रा काढण्यात आली. महावीर चौक ,अशोक नगर, क्रांतिवीर तरुण मंडळ, सतनाम चौक, चांभार गल्ली, ढोर गल्ली, कुंभार गल्ली, गुलजार तालीम, इमानियाल चौक , सरस्वती चौक, हेजनपूर , प्रकाश बापूजी हाऊसिंग सोसायटी आधी परिसरात या पदयात्रे द्वारे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना “हात” या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. काँग्रेसचे नरोटे यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत महिलांसह मतदारांचा मोठा सहभाग होता. मतदारांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पहार घालून अंत: करणपूर्वक स्वागतही केले. काही ठिकाणी सुहासिनींनी त्यांचे औक्षण केले. विजयाचा आशीर्वादही दिला.
गेल्या तीन टर्म पासून मतदारांनी मला आमदार म्हणून निवडून दिले. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदारही केले. आता याच मतदारसंघातून गिरणी कामगारांचा मुलगा असलेल्या चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
या पदयात्रेत सनी म्हेत्रे, आप्पासाहेब नावदगीकर, राजेंद्र कोरे, सुरेश पाटोळे, लखन गायकवाड, शुभांगी लिंगराज, संजय मोतेकर, कोमल माचले , महेश गायकवाड, विवेक इंगळे, श्याम केंगारे, संतोष मरेड्डी, नर्सिंग असादे, हनुमंत सायबोळू, आताऊल्ला पटेल, विलास मरेड्डी, चींनाप्पा भंडारे, विकास जरीफटके, सचिन कोल्लूर, अभि वाडे, शंकर दारलू, शुभम मरेड्डी, महावीर तालीम, अशोक नगर, क्रांतीवीर मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.