योगेश पवार यांचे आरोप, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी नेमली चौकशी समिती, रक्त तपासणी टेंडरला दिली स्थगिती

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील विविध १५५ प्रकारच्या रक्त तपासणी टेंडरची चौकशी करून अपात्र व्यक्तीची निविदा रद्द करावी या राष्ट्रीय छावा संघटनेच्या मागणीवरून हे टेंडर आता रद्द करून चौकशी साठी तिघांची समिती नेमल्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले.
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने २ ऑक्टोबर २०२४ रोजी आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार दिला होता. रक्त तपासणी टेंडरचे पत्रक कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्धीस दिले नाही. उलट सिव्हिल हॉस्पिटलमध्येच लावले. अधिष्ठाता ठाकूर यांनी याचा खुलासा केला नाही.
ज्यांना टेंडर दिले त्यांची स्वतःची रक्त तपासणी लॅब नाही. ते फक्त सिव्हिल हॉस्पिटल मधून पेशंटचे रक्त घेऊन दोन-तीन किलोमीटर लांब त्रयस्थ लॅबकडे देणार तेथून तपासणी करून हॉस्पिटलकडे देण्याचे काम करणार आहेत. असे असताना त्या लॅबला ७७ तपासण्यांचे टेंडर दिले. त्यांच्याकडेही सर्व मशिनरी नसल्याचा आरोप योगेश पवार यांनी केला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत व अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी त्यांना टेंडर दिले असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. यावर डॉ. ठाकूर म्हणाले, अशा आरोपांमुळे डॉक्टरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल सिव्हिलमध्ये खऱ्या अर्थाने रुग्णसेवा होते टेंडरलाही स्थगिती दिली आहे.