संध्याताई गायकवाड यांनी देशमुख मालकांसाठी काढली पदयात्रा, पदयात्रेला महिला आणि युवकांचा प्रचंड प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
प्रभाग क्र 8 पाणीवेस गणपती परिसरा मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रे निमित्त मालकांच्या विजयासाठी औक्षण करताना माजी.सो.म.पा.शिक्षण मंडळ सदस्या सौ.संध्या ताई गायकवाड तसेच मालकांचे स्विय सहाय्यक रमेश गायकवाड, पाणीवेस तालमीचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, अक्षय वानकर, सुभाष पवार, प्रसाद झुंजे, नविद देशमुख, उदय रूपनर, अमर काशीद, बिपिन धुम्मा, कल्पना चाटी, महादेव पवार तसेच पा तालमीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संध्याताई गायकवाड यांनी काढलेल्या प्रभाग क्रमांक आठ मधील पदयात्रेत महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रेच्या माध्यमातून आमदार विजयकुमार देशमुख यांना पाचव्यांदा निवडून देत महाराष्ट्रातील टॉप टेन आमदारांमध्ये विजयकुमार देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन संध्याताई गायकवाड यांनी केले.