सोलापूरक्राईम

खुन करुन पळुन गेलेल्या आरोपीस अटक, रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या हत्येचे गुढ उलगडले

सदर बझार पोलीसांना आरोपीस अटक करण्यात आले यश

सोलापूर : प्रतिनिधी

दिनांक 26/04/2024 रोजी पहाटे 05.00 वा.चे सुमारास सदर बझार पोलीस स्टेशन हददीत रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजुस, सिंमेट गोदामाजवळील मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आला होता. मयताचा अंगावर जखमा होत्या व त्याचा खुन झाल्याचे समजुन आले. सदर मयत व्यक्तीबाबत तपास करता त्याचे नाव संतोष बाबुराव घुमटे, वय-45 वर्ष, रा-रोजेश कोठे नगर, दमाणीनगर जवळ, सोलापुर असे असल्याचे समजले. त्याचे नातेवाईकांचा तपास करुन त्यांना बोलावुन घेण्यात आले. मयत इसमाचा भाऊ विजयकुमार बाबुराव गुमटे वय 38 वर्षे, व्यवसाय – व्यापार रा.38, रोजेश कोटे नगर, मुक्ताई मंदिराजवळ, दमाणी नगर सोलापूर याने दिलेल्या फिर्यादीवरुन नमुद मयताचे खुनाबाबत अज्ञात आरोपी विरुध्द सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजीस्टर नंबर 301/2024 भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि काटे, सहायक पोलीस निरीक्षक, सदर बझार पोलीस स्टेशन सोलापुर यांचेकडे देण्यात आला होता.

 

पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, विभाग-2 यांनी यातील आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या, सदर सुचनांप्रमाणे आरोपीची माहीती काढत असताना इसम नामे गणपत उर्फ सुनिल गायकवाड रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर हा सोलापुर रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे करतो व दि.26/04/2024 रोजी रेल्वे स्टेशन जवळ केलेला खुन त्यानेच केला आहे. अशी गोपनिय बातमीदाराकडून पोसई नितीन शिंदे यांना माहिती मिळाली. त्या मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे पोलीस उप-निरीक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच नमुद आरोपीने यातील मयताचा चोरलेला मोबाईल निवेदन पंचनाम्याने काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी राजकुमार, पोलीस आयुक्त, विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ, परमार मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2, लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ढवळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि सागर काटे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि नितीन शिंदे, म. सहा. फौ. अनिता जाधव, पोहेको औदुंबर आटोळे, पोहेकॉ संतोष मोरे, पोहेकों/ शहाजहान मुलाणी, पोहेकों/ राजेश चव्हाण, पोहेकों अय्याज बागलकोटे, पोहेकॉ महेश जाधव, पोना/सागर सरतापे, पोना/ लक्ष्मीकांत फुटाणे, पोकों/ अर्जुन गायकवाड, पोकों / मल्लू बिराजदार, पोकों/ सागर गुंड, पोकों/सोमनाथ सुरवसे, पोकों/ अबरार दिंडोरे, पोकों/ हणमंत पुजारी, पोकॉ गुणवंत आंगुले, पोकों/ सचिन राऊत, चापोना / समिर शेतसंदी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!