कोरोना लॉकडाऊननंतर पाण्यासाठी थाळीनाद, ‘पाण्याचा दिवस’ बंद करण्यासाठी रविवारी आंदोलन : मिलिंद भोसले

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर विकास मंचने रविवारी २६ मे सोलापूर शहरात थाळी नाद आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, केतन शहा. विजय जाधव यांनी या अनोख्या आंदोलनाबद्दल माहिती दिली.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये देशवासीयांनी कोरोना योद्धांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला थाळी नाद अजूनही स्मरणात आहे. या थाळी नादाचे अनेकांना कौतुक वाटले आणि अनेकांनी या प्रकाराची टिंगलही केली. सोलापुरात पुन्हा ‘थाळी नाद’ होणार आहे. त्याला कारण ठरले शहरातील पाणीटंचाई .
पाण्याचा दिवस असला की लोकांना कामधंदे सोडून पाणी भरत रहावे लागते. महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराचा निषेध म्हणून आम्ही थाळी नाद आंदोलनाची हाक दिली आहे. सोलापूरकरांनी रविवारी दहा वाजता आपल्या घरात बसूनच हे आंदोलन करावे. या आंदोलनात शहरातील विविध संघटना सहभागी होणार असल्याचे मिलिंद भोसले यांनी सांगितले.