
सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूरातील वडापूर गावचे माजी सरपंच राजश्री कोळी यांनी अनुसूचित जाती जमातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवली होती हे सिद्ध झाले आहे.त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असे पत्र दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सदर बझार पोलिसांना दिली आहे.
राजश्री औदुंबर कोळी यांनी सन 2020 – 21 मध्ये ग्रामपंचायत वडापुर येथील सार्वत्रिक निवडणूक अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली होती. सदर अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणपत्राबाबत बिपिन वसंतराव पाटील यांनी अनुसूचित जातीचा जमाती प्रमाणपत्र समितीकडे राजश्री कोळी यांनी जोडलेला अनुसूचित जाती जमातीचा दाखला बनावट असल्याचे तक्रार केली होती. पाटील यांनी तक्रारी सोबत मूळ माहेरीकडील गाव होटगी स्टेशन असताना कोळी यांनी पंढरपूर तहसिलदार यांच्या कार्यालयातील बनावट जात प्रमाणपत्र बनवून घेऊन त्या आधारे वडापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस दक्षता पथकाची संलग्न असलेल्या संशोधन अधिकारी यांनी अर्जदार कोळी महादेव अनुसूचित जमातीचे नसताना देखील कोळी महादेव जमातीचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जाती जमातीचा लाभ घेण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. हे सिध्द केले आहे.
या तक्रारीबाबत समितीसमोर प्राप्त कागदपत्रे, पोलीस दक्षता पथकाचा अहवाल, पंढरपूर तहसील कार्यालय यांचा लेखी अभिप्राय इत्यादी सर्व बाबींचा बारकाईने गांभीर्याने विचार करून अनुसूचित जाती समितीने एकमताने राजश्री कोळी हा कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही त्यामुळे कोळी यांचे महादेव अनुसूचित जमातीचा प्रमाणपत्र अवैद्य ठरवले आहे. त्यामुळे राजश्री कोळी यांच्या वरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नायब तहसीलदार आर.बी.भंडारे यांना याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल दक्षिण तहसील कार्यालयात सादर करण्याचा करण्याचे आदेश देखील दक्षिण तहसीलदार जमदाडे यांनी नायब तहसीलदारांना दिले आहेत.