102 पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहिर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची विधानसभेची तयारी

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
सोलापूर शहर नुतन कार्यकारिणी प्रांतिक सदस्य शहर उत्तर विधनसभा दिपक राजगे, महादेव गवळी, नागनाथ मेंगाने, दिनेश शिंदे, प्रांतिक सदस्य शहर मध्य विधनसभा विठ्ठलसा चव्हाण, इब्राहिम कुरेशी, रामचंद्र साठे, प्रांतिक सदस्य दक्षिण विधनसभा डॉ. दादाराव रोटे, विलास लोकरे, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सुर्यकांत शेरखाने, प्रा. राहूल बोळकोटे, खजिनदार सुनिलकुमार इंगळे, शहर उपाध्यक्ष भारत बन्ने, विष्णू निकंबे, पिरअहमद शेख, बिसमिल्ला शिकलगर, संजीवनी कुलकणी, अजित बनसोडे यांच्यासह अनेकांची निवड करण्यात आली.
आज पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सविस्तर माहिती दिली. नव्या कार्यकारणीमध्ये शहरातील तीनही मतदार संघासाठी प्रत्येकी ३ असे एकंदर ९ प्रांतिक सदस्य आहेत. तर ३ जनरल सेक्रेटरी, १ खजिनदार, तब्बल ३१ उपाध्यक्ष, १९ शहर सरचिटणीस, १७ चिटणीस, १० कार्यकारणी सदस्य आणि १२ कायम निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्ष एक संघ आहे कोणतेही मतभेद नाहीत. पक्षाकडे युवकांचा ओघ अधिक आहे असेही खरटमल म्हणाले. पत्रकार परिषदेस यू एन बेरिया, मनोहर सपाटे, महेश कोठे, भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, रवी पाटील, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, शंकर पाटील आदी उपस्थित होते.