काँग्रेसच्या मामांनी भरला अर्ज, महेश कोठे यांची डोकेदुखी वाढणार.? काँग्रेसच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून भरली उमेदवारी.?

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे आज वरिष्ठ नेत्याच्या सांगण्या वरून काँग्रेस पक्षातर्फे नामनिर्देशन पत्र दाखल केले. अर्ज दाखल करताना माजी नगरसेवक एन के क्षीरसागर, ईसाक पुढारी, चक्रपाणी गज्जम, मंजुनाथ सिंदगी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
काँग्रेस कडून शहर उत्तर साठी अनेक जण इच्छुक होते परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा सुटला त्यामध्ये महेश कोठे यांना संधी मिळाली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र करत महेश कोठे यांनी असंख्य कार्यकर्त्या समवेत महापुरुषांना अभिवादन करत आपली उमेदवारी आज दाखल केली.
परंतु काँग्रेसचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपरिवारां समवेत दाखल केला यावेळी बोलताना सुनिल रसाळे म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पारंपारिक उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे दोन टर्म राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा होता आमच्यावर अन्याय झालेला आहे.
मागील इतिहासात पाहता ज्यावेळेस काँग्रेसकडून महेश कोठे हे उत्तर मध्ये भाजपाच्या विजयकुमार देशमुख यांच्याशी लढत देत होते त्यावेळी राष्ट्रवादीच्या मनोहर सपाटे यांनी अपक्ष फॉर्म भरून लढत दिली आणि त्यांच्यामुळेच महेश कोठे यांचा पराभव झाला होता याचीच पुनरावृत्ती शहर उत्तर मध्ये होणार का किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून भरलेला उमेदवारी अर्ज वरिष्ठांच्या सांगण्यावरून सुनील रसाळे माघारी घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सुनील रसाळे यांच्या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे याचा शोध महेश कोठे घेणार का.? हे पाहणे औतुकाचे ठरणार आहे.