हजारो हातांना काम देणारा चेहरा शहर मध्य साठी हवा, प्रा शिवाजीराव सावंत यांना उमेदवारीची शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे करणार मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत यांनी सोलापूर जिल्ह्याचा पदभार घेतल्या पासून सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भरघोस कामे केली. विशेष करून शहर मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांनी महा आरोग्य शिबिर राबवत अनेकांची मने जिंकली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे शहर मध्ये राबवत हजारो महिलांना आधार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाळ, शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसेनेच्या माध्यमातून शहर मध्य मध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
विद्यमान आमदार किंवा इतर पक्षावर टीका न करता काम हा कामाचा गुरु आहे असं म्हणत त्यांनी फक्त सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवत त्यांच्या आरोग्यासह त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्न करत शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह निर्माण करत एक संघ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला.
याच त्यांच्या सर्व गुणांमुळे मध्य मधील शिवसैनिकांनी आगामी शहर मध्य विधानसभा ही प्रा शिवाजीराव सावंत यांनी लढवावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती दिली.