राज ठाकरेंना मनसे कार्यकर्त्यांची अनोखी भेट, भेटीची चर्चा दोन्ही शिवसेना आणि शिवसैनिकात रंगली

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने मनसेच्या उमेदवारासाठी भव्य जाहीर सभा घेत महाराष्ट्रात दौरा करत आहेत. याच निमित्ताने त्यांनी पंढरपूर मंगळवेढा येथील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारा निमित्त मंगळवेढा येथे जाहीर सभा घेतली. सोलापूर विमानतळ येथे विमानाने आगमन झाल्यानंतर सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
हिंदूहृदयसम्राटांचे विचारांचे वारसदार राजसाहेब ठाकरे यांचे मंगळवेढा येथील सभेसाठी सोलापूर विमानतळावर आगमन झाले त्यावेळी त्यांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नॅपकिन वरील प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी आवर्जून राज ठाकरे यांनी दिलेले भेटवस्तू कशा पद्धतीने तयार करतात याची माहिती कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली.
यावेळी मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, शहर प्रमुख जैनुद्दीन शेख, अभी रामपुरे, दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार महादेव कोंगणुरे, उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.