हार कर भी जीतने वाले को बाजिगर कहते है, तेरे जीत से जादा मेरे हार के चर्चे है, निवडणूक जिंकल्यावर माजू नये, राम भाऊंनी धू धू धुतले..

सोलापूर : प्रतिनिधी
जय श्रीराम जय श्रीराम, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम या घोषणांनी आमदार राम सातपुते यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सोलापूर लोकसभेच्या ऋणानुबंध मेळाव्याच्या निमित्ताने लोकसभा मतदारसंघातील सर्व भगिनी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार राम सातपुते भाषणावेळी बोलताना म्हणाले, मी सर्वांना लोकसभा निवडणुकीत जवळून पाहिले सर्वांनी झोकून देऊन काम केले. हम चुनाव जरूर हारे है लेकिन होसला नही, निवडणूक हरण जिंकणं हा वेगळा भाग, पण कार्यकर्ता म्हणून वेदना होत असतात कार्यकर्ता सकाळी सात वाजता घराबाहेर पडतो रात्री बारा वाजेपर्यंत काम करतो हे मी लोकसभा निवडणुकीत पाहिला आहे. अनेत कार्यकर्त्यां कडून भरपूर शिकायला मिळालं. तुमच आमचं भाग्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुनश्च एकदा पंतप्रधान झाले. या देशाला गरज होती राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत, इतिहास, संस्कृती, वैभव या ठिकाणी खंबीर नेतृत्व पाहिजे होतं ते नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय. भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रनिष्ठ पार्टी आहे एक विचारणे भारावलेला कार्यकर्ता असतो हिंदुत्वाच्या विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्ता भारत माता की जय, वंदे मातरम चा नारा देत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून काम करणाऱ्या कार्यकर्ता असतो.
भाजपचा कार्यकर्ता कधी हारत नसतो एक तर निवडणूक जिंकत असतो नाहीतर नवीन काहीतरी शिकत असतो. किशोर देशपांडे मंद्रूप मधील कार्यकर्ता माझी प्रेरणा आहेत. 1952 नंतर आपण पाहिलो अनेक निवडणुका हरलो जिंकलो परंतु 2 खासदारा वरून 302 खासदारावर पर्यंत नेण्याचं काम कार्यकर्त्यांनी केले. अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात यायचं नाही कोणतं पद घ्यायचं नाही फक्त भगव्या झेंडासाठी त्यांनी काम केलं, भाजपचा संदीप जाधव नावाचा कार्यकर्ता झोकून देऊन काम केलं, एका एका बुत वरील तीस तीस नाव कमी केले हिंदुत्वाचे नाव कमी केले, भाजप ही निवडणूक हरली असेल परंतु त्यांनी यातून भरपूर शिकले. निवडून आलेल्या उमेदवाराचे मी अभिनंदन करतो.
खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकणं असं म्हणतात निवडणूक जिंकल्यावर माजू नये निवडणूक हरल्यावर लाजू नये आम्ही आमचा पराभव स्वीकारलाय. हे काय करणार आहेत निवडून आल्यानंतर हे सोलापुरातील जनता पाहणार आहे. सोलापूर शहर उत्तर, मध्य, दक्षिण मधील जनता भाजप सोबत राहिली. मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर भागात आपली ताकद कमी आहे. त्या भागात आपल्याला लोकांना सांगावं लागेल भाजपचं काम. बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला 1990 उजाडले याला काँग्रेस जबाबदार आहे.
लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी आपल्याला तीन महिन्यात संधी मिळाले हे आपलं नशीब आहे. जे बोगस मतदान झाला आहे त्यावर आपल्याला काम करावे लागणार आहे मी देवेंद्र कोठे यांच अभिनंदन करतो, लोकसभेच निवडणूक झाल्यानंतर त्यांनी महा आरोग्य शिबिर घेतलं, घरोघरी जाऊन काम सुरू केले. राम सातपुते ला काय मिळालं, पाच लाख 46 हजार मत पडली एवढ्या लोकांनी मला खासदार म्हणून मतदान केलं. जनतेने मला कधीही संपर्क करा मी तुमच्यासाठी जिवाच रान करेल, मध्यरात्री उभा राहीन, कारण की मी हाडाचा कार्यकर्ता आहे.
मी हरल्या नंतर काहींनी जल्लोष केला काहीनी दुःख व्यक्त केलं, राम सातपुते वडापाव खाऊन आंदोलन करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे, एका पराभवाने खचणारा हा राम सातपुते नाही दगडाला पाजर फोडेल एवढा संघर्ष कडून आलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला खचून जायचं नाही पूर्ण ताकतीने या निवडणुकीनंतर उभे राहायचं आहे मला विश्वास आहे सोलापुरातील जनता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मागे मोठ्या ताकतीने उभे राहील. प्रत्येकाने आपापल्या भागातून झालेल्या मतदानावर चिंतन केलं पाहिजे प्रत्येक पानाचा अभ्यास केला पाहिजे. राम सातपुतेच्या पाठीमागे जशी भारतीय जनता पार्टी आहे तसा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे भाजप आहे हे विश्वास देण्यासाठी मी आलो आहे.
मध्य मधील एका कार्यकर्त्यावर MPDA लावण्याचा समोरच्यांनी प्रयत्न केला मी दोन दिवस झटून त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो त्याच्या परिवाराला आधार देण्याचा काम केले. हो जाओ तयार साथियो, हो जाओ तयार.. आपल्या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळात भविष्यासाठी तयार राहायचं आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे. समोरच्यांनी जसं निवडणुकीत धर्म यावर निवडणूक खेळली त्यासाठी आपल्याला देखील निवडणूक लढवावी लागेल. जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणत आपले भाषण संपवले. उपस्थितानी टाळ्याच्या गजरात राम सातपुते यांना प्रतिसाद दिला.