यंदा भाजपचा पराभव अटळ, भाजपच्या बालेकिल्यात महेश कोठे कडाडले, भाजप च्या बालेकिल्ल्यात महेश कोठे यांचे जोरदार स्वागत

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची गुरुवारी सकाळी भाजपचा बाले किल्ला असलेल्या प्रभाग आठ येथून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, ठिकठिकाणी महेश कोठे यांचा नागरिकांकडून सत्कार करण्यात आला, अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून महेश कोठे यांचे स्वागत करण्यात आले,
शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून महेश कोठे यांना मोठया प्रमाणात पाठींबा मिळत आहे, गेल्या वीस वर्षांत शहर उत्तर चा विकास झाला नाही,
पदयात्रेस दत्त चौक येथून सुरुवात होऊन माणिक चौक, विजापूर वेस, बारा इमाम चौक, सोमवार पेठ, शंकरलिंग मंदिर, साखर पेठ, औद्योगिक बँक, कंन्ना चौक मार्गे काढून कौतम चौक येथे समारोप करण्यात आला.
गेल्या वीस वर्षांत विकासकामे न झाल्याने मालकांचे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम करत असून विकासाच्या मुद्यावर कोणीलाही बोलता येत नाही, त्यामुळे यंदा शहर उत्तर मध्ये परिवर्तन अटळ असून यंदा शहर उत्तर मध्ये तुतारी वाजणार असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.
यावेळी उदय चाकोते, संजय शिंदे, राजू कुरेशी, प्रथमेश कोठे, सरफराज शेख यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.