श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पुजन होऊन सुरुवात

सोलापूर : प्रतिनिधी
सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक दुपारी ठीक तीन वाजता चौपाड येथील श्री बालाजी मंदिरा समोर पोलिस आयुक्त एम राजकुमार, माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सोमपा माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याहस्ते मानाच्या देशमुखांच्या पालखीतील श्रींचे विधिवत पुजनाने आरती करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचा मध्यवर्तीच्या वतीने पुष्पहार फेटा बांधुन सत्कार करण्यात आला यानंतर पालखी पुढील मार्गावर मार्गस्थ झाली.
प्रारंभी शिवानुभव मंगल कार्यालय येथील सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या कामेश्वर व अतिथी गणपतीचे पुजन उत्सव समिती अध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मध्यवर्तीची श्रीगणरायाचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पारंपारिक वाद्याने सनई चौघड्याच्या निनादात भगव्या झेंड्यासह सजविलेल्या बैलगाडी मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाली.
दत्त चौक येथे आल्यानंतर दुपारी ठीक एक वाजता सर्व ट्रस्टी उत्सव समितीचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासह देशमुखांच्या वाड्यात असलेल्या श्री गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन मिरवणूकीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले.
देशमुख परिवाराच्यावतीने श्रींच्या मुर्तीचे मंत्र पुष्पांजलीने श्री सोमशंकर देशमुख, सुधीर देशमुख कुटुंबासह श्रींच्या मुर्तीचे पुजन केले.
त्या नंतर मुर्ती रंगबिरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत बसविण्यात आले टाळमृदंगांच्या निनादात गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात पालखी दुपारी ठीक दीड वाजता पुढील मार्गाने विसर्जन मिरवणूकीस मार्गस्थ झाली.
या मिरवणुकीत ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर, ट्रस्टी सुनील रसाळे, दास शेळके, माजी आमदार नरसिंग मेंगजी, श्रीशैल बनशेट्टी, ट्रस्टी कार्यवाह संजय शिंदे, ट्रस्टी उपाध्यक्ष विजय पुकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, सोमनाथ मेंडके, अनिल गवळी, मल्लिनाथ याळगी, गौरव जक्कापुरे, लताताई फुटाणे, उत्सव कार्यवाह आकाश हारकुड, शिवानंद सावळगी, संतोष खंडेराव, मल्लिनाथ सोलापुरे, नंदकुमार उपाध्ये, अशोक कलशेट्टी, विजयकुमार बिराजदार, उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, किसन गर्जे, दिलीप पाटील, चिन्मय पाटील, गिरीश शहाणे, विरेश सक्करगी, आशिष उपाध्ये, प्रसाद कुमठेकर, अभिषेक रंपुरे, गोवर्धन दायमा, शिवानंद येरटे यांच्यासह ट्रस्टी, विश्वस्त उत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन परिश्रम घेतले. मध्यवर्तीच्या मिरवणुकीत बावीस उत्सव मंडळांनी गुलालाची मुक्त उधळन करुन उत्कृष्ट लेझीम खेळ सादर करत सहभागी झाले होते.
मध्यरात्री साडेबारा वाजता आजोबा गणपतीचे दत्त चौकात़ आगमन झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासुनची परंपरा अखंडपणे सुरु असून मध्यवर्तीच्या पुजनाशिवाय पुढील मार्गाने मार्गस्थ होत नाही म्हणून मध्यवर्तीचे ट्रस्टी, विश्वस्त, उत्सव पदाधिकारी मानाच्या आजोबा गणपतीचे पुजन केल्यानंतरच राजवाडे चौक मिरवणुक मार्गावर मार्गस्थ झाला.
पंजाब तालीम येथे आल्या नंतर मुस्लिम समाजाच्या वतीने राजु हुंडेकरी, जावेद शेख, फयाज शेख, नियाज शेख यांच्या हस्ते आजोबा गणपतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.