मेळावा शिवसेनेचा चर्चा भाजपच्या नगरसेवकाची, शिवसेनेच्या त्या बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना UBT पक्षाच्या वतीने भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे शिवसेना सचिव विनायक राऊत, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्या निमित्त हुतात्मा स्मुर्ती मंदिरच्या प्रवेशद्वारावर आणि त्याच्या शेजारी मेळाव्यास येणाऱ्या शिवसैनिकांचे स्वागत करण्याचे डिजिटल फ्लेक्स लावले होते. त्यातील एका डिजिटल फ्लेक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खड्डा तालीम सोलापूर कृष्णा सुरवसे मित्र परिवाराच्या वतीने शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या स्वागतासाठी लावलेल्या डिजिटल फ्लेक्स वर भाजपाचे माजी नगरसेवक स्वर्गीय सुनिल कामाठी यांचा फोटो दिसून आला. याची चर्चा मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रंगल्याचं कार्यकर्त्यां मधून बोलले जात आहे.
शिवसैनिक कसा असावा तर भाजपचा नगरसेवक राहूनही शिवसेनेचे विचार जोपासत शिवसेनेला सहकार्य करणारे स्वर्गिय सुनिल कामाठी यांचा सारखा असावा, कामाठी हे मूळचे शिवसैनिक असून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून कधीही फारकत न घेता 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करत काम केले. त्यांनी भाजप प्रवेश करून नगरसेवक झाले तरी शिवसेनेची असलेली आपुलकी नेहमी दिसून येत होती. त्यांच्यावर असलेल्या प्रेमाने खड्डा तालीम सोलापूर, कृष्णा सुरवसे मित्रपरिवार च्या वतीने डिजिटल फ्लेक्स लावल्याचं ही कार्यकर्त्यांनी सांगितलं.