सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

बोगस बांधकाम परवाने देऊन अडीच लाखाची फसवणूक, पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी

नकाशे मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही बनावट बांधकाम परवाने देऊन अर्जदार व महापालिकेला २ लाख ४२ हजार ४०८ रुपयांना फसवल्या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात ४ जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०८, ४१९, ४२०, ४६६, ४६८, ४६९, ४७१, ४७३, ४७६, ३४ सह सार्व अभि का क ८, ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी (रा. ए स्केअर डिलक्स अर्पाटमेंट, बसवेश्वर नगर, सोलापूर), श्रीकांत बसण्णा खानापुरे (रा. रेल्वे स्टेशनजवळ, सोलापूर), आनंद वसंत क्षीरसागर (रा. सुंदरम् नगर, विजापूर रोड), शिवशंकर बसवंत घाटे (रा. रेवण सिद्धेश्वर नगर, सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता नीलकंठ शिवानंद मठपती ५४ वर्ष, राहणार सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. यातील आरोपींनी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान महापालिकेत कामावर असताना शहरातील काही ठिकाणी सुरू होणाऱ्या बांधकामांचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार, नसतानाही ते मंजूर केल्याचे कागदपत्रं तयार केले.

खोटे व बनावट बांधकाम परवाने संबंधित बांधकाम करणाऱ्या अर्जदारांना व महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला दिले. बांधकाम परवाने मंजूर केल्याचे आवक रजिस्टर व अनधिकृत बांधकाम परवाना क्र. १ ते ९६ संदर्भातील दस्त गायब केला. याबाबत महानगर पालिकेला मात्र कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून चौघांनी संगनमताने २ लाख ४२ हजार ४०८ रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!