अतिक्रमण कोण लक्ष देणार.? बसवेश्वर नगर जि. प. प्राथ. शाळेच्या जागेमध्ये मोकळ्या आवारात अतिक्रमण

सोलापूर : प्रतिनिधी
मोजे बसवेश्वर नगर, देगांव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथील बॅकवर्ड क्लास को- ऑप. हौसिंग सोसायटी लि., बसवेश्वर नगर, देगांव यांच्या मालकीचा गट नंबर १४०/३/२ मधील १९,००० चौ.फु. जागा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी साधारण ५० वर्षापूर्वी देण्यात आलेली आहे, आजमितीस त्या जागेमध्ये सदरहू शाळेचे कामकाज चालू आहे. सदर शाळेच्या अवतीभोवती बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे.
तसेच संस्थेच्या राखीव जागा व त्या जागेतील सार्वजनिक विहिर बुजवून त्या ठिकाणी देखील अतिक्रमण झालेबाबत दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, आयुक्त सो.म.पा., अधिक्षक भूमि व मालमत्ता सो.म.पा., वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलगरवस्ती पो. स्टे. यांना शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांना कैलास धर्मदेव ढावरे यांनी तसेच ग्रामस्थांच्या वतीने याबाबतचे सविस्तर निवेदन दिले होते. यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सदरहू जागेवर अतिक्रमण केल्यामुळे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना याचा फार त्रास होत आहे. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दमदाटी व धमकी दिली जाते. सदरील करण्यात आलेले अतिक्रमण त्वरीत काढून संबंधितांवर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई अशी मागणी कैलास ढावरे यांनी केली.