आमदार सुभाष देशमुख यांनी जुळे सोलापूर आणि परीसरातील भागात लक्ष दिले नाही तर त्यांच्या घरात साप सोडू : संभाजी ब्रिगेड

सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथे मोठ्या पावसाचे पाणी घरामध्ये शिरून अनेक नागरिकां आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. गेल्या दहा वर्षापासून जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर या सखल भागांमध्ये अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देऊन सुद्धा या लोकप्रतिनिधींनी या भागाकडे दुर्लक्ष केलेले आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न सोडविला तर नाहीच पण या आपत्तीमुळे नागरिकाना भेट सुद्धा दिली नाही. असवेदनशील लोकप्रतिनिधीचा जाहीर धिक्कार येथील नागरिकांनी केलेला आहे.
पावसाच्या पाण्यामुळे घरामध्ये बेडूक, विंचू, किंटक, साप वगैरे निघत आहेत. दरवर्षी आमदार सुभाष देशमुख महानगरपालिका अधिकाऱ्या समोर बैठकीचा दिखावा करतात. प्रत्यक्ष या भागांमध्ये कोणतेच काम झाले नाही. आयुक्त शितल तेली उगले यांनी आढावा बैठक घेऊन सुद्धा विभागीय झोनचे कोणतेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी या भागांमध्ये नालेसफाई केली नाही किंवा त्यांनी भेट सुद्धा दिली नाही.
पहिल्याच पावसामध्ये या भागातील अवस्था असे असून येणारा पावसाळ्यात या भागातील नागरिकांचे काय हाल होणार आणि त्यांना मदतीला कोण जाऊन येणार हे जनता पाहत आहे. येणाऱ्या विधानसभा आणि नगरसेवक च्या निवडणुकी मध्ये जनता काम न करणाऱ्याना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा शाम कदम यांनी दिला.