सोलापूरक्राईममहाराष्ट्र

बंद केलेल्या पोलीस चौकी त्वरित सुरू करा, पोलिस आयुक्तांना निवेदन

पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील मुख्य पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलीस चौकी बंद ठेवल्याने मोडकळीस आलेल्या आहेत, काही ठिकाणी कचरा कुंडी, मोकाट जनावरे वावरत आहेत.

वास्तविक पाहता शहराचे वाढते शहरीकरण, व्यापारी नागरी वसाहती, विविध शासकीय निम शासकीय, कार्यालय शाळा महाविद्यालया, दवाखाने परिसरात जर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकीमुळे तातडीने संपर्क साधण्यासाठी फायदेशीर असते.

आज शहरातील विविध भागात उघडपणे भुरटे चोर, रोडरोमिओंचा वावर, रिकाम्या टेकड्यांच्या हुल्लडबाजी, बेधडकपणे वाहने चालवणे अशा विविध गंभीर घटना, गुन्हेगार यांच्यावर पोलीस खात्याची करडी नजर असणे हि नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या द्रष्टीने महत्त्वाचे आहे.

अशा पोलीस चौकीमुळे वचक बसेल या विषयाची गांभीर्याने विचार व्हावा असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलिस आयुक्त यांना लेखी निवेदन देत मागणी करण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख विष्णु कारमपुरी, परिवहन समितीचे माजी सदस्य शहर उत्तर विधानसभा समन्वयक प्रमुख विजय पुकाळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!