सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
“प्रणिती शिंदे म्हणजे दू तोंडी गांडूळ” भाजपाच्या वृषाली चालुक्या यांची टीका

सोलापूर : प्रतिनिधी
बदलापूर येथील दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी राज्यभर त्याचा नुसता वनवा पेटवला होता, काँग्रेसच्या नेत्यांनी तर रस्त्यावरच न्यायनिवाडा करण्याची भाषा केली होती. बदलापूरच्या घटनेवर तर काॅग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेत्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीच्या सरकारला निस्तेज सरकार आहे अशी टीका केली होती.
पण चंद्रपूर येथे एका काँग्रेसच्या नेत्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांची भूमिका पुढे आली नाही, काॅग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते, मूग गिळून गप्प बसले आहेत. खासकरून खासदार प्रणिती शिंदे यांची भूमिका हि, गांडूळ सारखे आहे, असं म्हणत भाजप प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्या यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.