सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

Manoj Jarange : “उपचार नाही घेतले तर”, डॉक्टरांनी जरांगे बाबत व्यक्त केली भीती..

सोलापूर : प्रतिनिधी (अंतरवली सराटी)

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजालवणी आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. अशात मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली आहे, तात्काळ उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.

डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. जरांगेंची शुगर 62 तर बीपी 98 पर्यंत घसरला आहे. डॉक्टरांनी अलिकडेच केलेल्या तपासणीमधून ही बाब समोर आली आहे. जरांगेंची सर्व तपासणी करणाऱ्या डॉ. पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काल उपोषणाचा चौथा दिवस संपला आहे. मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची सक्त गरज असल्याचं डॉ पाटील म्हणाले आहेत. जरांगेंनी असं न केल्यास “ते बेशुद्ध होवू शकतात, असं डॉक्टर म्हणाले.

मागण्यांसाठी जरांगे झाले आक्रमक

मनोज जरांगेंनी सगेसोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिलेली मुदत 13 जुलै रोजीच संपली आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे आक्रमक भूमिकेत आहेत. जरांगेंनी उपोषण सुरू केलं आहे. दुसरीकडे मागेल त्या मराठा बांधवाला आरक्षण आणि मराठ्यांना ओबीसीमधून टीकणारं आरक्षण या मागणीवर जरांगे ठाम आहेत. अन्यथा राज्यातील विधानसभा निवडणुकीत सरकारला कचका दाखवू, असं जरांगेंनी या आधीच स्पष्ट केलं आहे. 288 उमेदवार पाडण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे.

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणी साठी सरकारवर दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. सतेच विधानसभा निवडणूकीत 288 उमेदवार पाडू, ठिकठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार देणार असं जरांगे म्हणाले होते. अशा परिस्थितीत आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार कोंडीत सापडण्याची चिन्हं आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!