सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

पत्रा तालमीतील नानांचा मुलगा झाला वकील, गौरवने विद्यापीठात पटकावला प्रथम क्रमांक

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात गौरव काळे LLB मधे प्रथम

सोलापूर : प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विदयापिठात एलएलबी फायनल वर्षामध्ये विद्यापीठातून प्रथम येन्याचा मान गौरव पद्माकर काळे यांनी पटकवला. या निमित्त जाणता राजा बहूउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षक महासंघ अध्यक्ष प्रा हरीदास गवळी होते. प्रमुख्य पाहुणे म्हणुन डाॅ युवराज सुरवसे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले, एलएलबी मधून दयानंद महाविद्यालयातून आणि विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने गौरव पद्माकर काळे यांनी यश संंपादन केले याबद्दल पुढील शैक्षणिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रम प्रसंगी डाॅ संतोष बताले, हर्षवर्धन प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत, न्यु इंग्लीश स्कुल दोड्डीचे मुख्याध्यापक गंगाधर डोके, भालकीचे नव उदयोजक पवन पाटील, पोलिस पाटील विकास लक्के, संगमेश्वर कालेजचे प्रा शंकर कोमुलवार, इतिहास परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा स्वामीनाथ कलशेट्टी, शिक्षण महर्षी डाॅ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष जिवन यादव, संजय पवार, शिवदास वाडकर, गणेश निळ, महेश सावंत, प्रा संजय जाधव, रामचंद्र निकम, इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ यांनी सर्वांचे स्वागत केले सुत्रसंचलन मारुती सावंत यांनी केले तर आभार प्रा संजय जाधव यांनी मानले. विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उतीर्ण होनारे गौरव पद्माकर काळे यांनी सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!