सोलापूरक्राईम

सोलापूर बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी स्विकारला पदभार, वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आगामी वर्षात विविध कायदेविषयक मार्गदर्शन व्याख्यान, सेमिनार, वर्कशॉप, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवचे आयोजन करण्यात येणार

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर बार असोसिएशन चे सन २०२४-२५ वार्षिक सर्व साधारण सभा बार असोसिएशन हॉल येथे मावळते अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस बार असोसिएशन चे बहुतांश सिनिअर आणि ज्युनिअर वकील बंधू भगिनी व मान्यवर ज्येष्ठ विधीज्ञ उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक अहवाल मंजूर करण्यात आला. आणि सन २०२४-२५ सालाकरिता निवडून आलेल्या नविन पदाधिकाऱ्यांचे निकाल वाचून दाखवण्यात आले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. अमित विश्वनाथ आळंगे, उपाध्यक्ष ॲड. व्ही. पी. शिंदे, सेक्रेटरी ॲड. मनोज नागेश पामुल, सह सेक्रेटरी ॲड. निदा सैफन आणि खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे यांना अनुक्रमे मावळते अध्यक्ष सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष ॲड. असीम बांगी, सेक्रेटरी ॲड.करण भोसले, सह सेक्रेटरी ॲड.अनिता रणशृंगारे आणि खजिनदार ॲड.अविनाश काळे यांनी पदभार सोपवून निवड पत्र दिले तसेच बार असोसिएशन व उपस्थित सिनिअर व ज्युनिअर वकिलांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सोलापूर प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदिपासिंह रजपूत, सोलापूर बार असोसिएशन चे माजी अध्यक्षा ॲड. एम.बी. जोशी चिंचोळकर, माजी अध्यक्ष ॲड.सी. एम. सावंत, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड, बापूसाहेब देशमुख, ॲड. संतोष न्हावकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यानी सर्व मतदार सभासदांचे आभार मानून आगामी वर्षभर विविध कायदेविषयक मार्गदर्शन व्याख्यान, सेमिनार, वर्कशॉप आयोजन, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव आयोजित करण्याबाबत मनोदय व्यक्त केला.

शेवटी नवनिर्वाचित खजिनदार ॲड. श्री. विनयकुमार कटारे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!