
सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी जुना विडी घरकुल येथे राजा सिंह यांची सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली. तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात उद्भवलेल्या वादावरदेखील त्यांनी जोरात टीका केली.
यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, नागपूरचे आमदार सुधाकर ओवाळे, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, संजय कोळी, डॉ. किरण देशमुख, राजकुमार हंचाटे, राजकुमार पाटील, रवी नादरगी यांच्यासह शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते. टी. राजा सिंह आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, केरळसारखे राज्या सध्या आतंकवाद्यांची फॅक्टरी बनली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन नाही. तसेच त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमताही नाही. अशी टिका केली यावेळी हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस ही निष्क्रिय लोकांची पार्टी झाली आहे. त्यांचे नेते भ्रष्टाचारात माहिर आहेत. सर्वाधिक घोटाळे त्यांच्याच काळात झाल्याचा आरोप हैदराबादचे आमदार टी राजा सिंह यांनी केला.