‘दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी ‘गॅस सिलेंडर ’ चिन्ह लक्षात ठेवा’, संतोष पवार यांच्या वंदन दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
वंदन दौऱ्या अंतर्गत २५१,सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील हत्तूर, आहेरवाडी, औराद, कुडलसंगम, टाकळी, मंद्रूप, भंडारकवठे,खानापूर,कुसूर,कंदलगाव,गुंजेगाव,बेलाटी,विंचूर ह्या गावाला भेट देऊन तेथील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात करून परिसरातील मतदारांशी संवाद साधला. या दौर्यामध्ये परिसरातील ग्रामस्थांनी पवारांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. तसेच माता भगिनींनी संतोष पवार यांचे औक्षण करत स्वागत केल.
तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांनी आजवर आपल्या राजकीय स्वार्थासाठीच गटा-तटाच राजकारण करून आहे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी विकासाच्या मार्गावर अडथळे आणून तालुक्याला मागे नेण्याचे काम केले आहे.आता स्वार्थाच्या या राजकारणाला थांबवण्याची वेळ आली आहे तालुकयातील जनतेने प्रस्थापित राजकीय नेते आणि घराणेशाहीला आपल्या मतातून उत्तर देऊन परिवर्तन घडवून तालुक्याच्या हितासाठी व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बदल घडवून विकास घडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हाला आपला संपूर्ण समर्थन देऊन आपल्या तालुक्याचा विकास, कल्याण आणि समृद्धीचा मार्ग खुला होईल असं आव्हान आपल्या गावभेट दौऱ्यात पवार यांनी केलं..याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष – विजयकुमार गायकवाड , शहराध्यक्ष – प्रशांत गुडेवार ,सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष – सुरेश देशमुख , सह सचिव – शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक – उत्तम दिलपाक संतोष राठोड ,अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार व मार्ग फाऊंडेशनचे पदाधिकारी व की सदस्य उपस्थित होते.