आमदार सरोजनी अहिरे व आमदार इद्रिस नाईकवाडी यांचे सोलापुरात राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत

सोलापूर : प्रतिनिधी
आमदार सरोजनी अहिरे व आमदार इद्रिस नाईकवाडी हे काही कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील संपर्क कार्यालयास अहिरे व नाईकवाडी यांनी भेट दिली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान व इतर पदाधिकाऱ्यां सह पुष्पगुच्छ देऊन दोघांचेही सोलापुरात स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी या भेटी दरम्यान आमदार अहिरे व नाईकवाडी यांनी सोलापूरच्या अनेक विषयांवर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्यासमवेत विशेष असा संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, उद्यकिर्ती अर्बन बँक मोडनिंब चे चेअरमन उदय माने,
जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महेश निकंबे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, युवक समनव्यक दत्ता बडगंची,
अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक शेख, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, दिव्यांग विभाग अध्यक्ष एम. एम. इटकळे, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे, श्यामराव गांगर्डे, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, मोईज मुल्ला, यांच्यासह पक्षातील ईतर सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.