सोलापूरमहाराष्ट्रसामाजिक

गावासाठी घरावर ठेवले तुळशीपत्र, ६ लाख रुपये किमतीच्या ३०० टनाच्या उसावर सोडलं पाणी

कोरवली गावाला दोघा भावांकडून टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा.

सोलापूर : प्रतिनिधी

पाणीटंचाईचा सामना करणार कोरवली ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी वाळे कुटुंबीय पुढे आले आहे. वाळे कुटुंबीयांच्या वतीने मोफत टँकरद्वारे गावाची तहान भागवली जात आहे.

मोहोळ तालुक्यातील अनेक गावात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे पाणीटंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत होते.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेल व विहीर कोरडी पडल्याने गावात पाणी समस्या निर्माण झाली होती. पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना पहाटेपासूनच रांग लावावी लागत होती. गावातील नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होते. मिळेल तेथून पाणी आणून गावकऱ्यांना तहान भागवावी लागत होती. हीच गैरसोय लक्षात घेऊन गावातील पाणी टंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाळे व त्यांचे बंधू धनंजय वाळे या बंधूंनी कै.अमोगसिद्ध वाळे व कै.श्रीशैल वाळे यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या बोरवेल व विहिरीतून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा गावात सुरू केला आहे.

यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा आहे. साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरवली पाणीपुरवठा करणारी विहीर बोअरवेल कोरडी पडल्याने सध्या पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत वाळे कुटुंबीयाने सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःचे सहा एकर ऊस क्षेत्र सोडून सामाजिक बांधिलकी जोपासत सहा एकर ऊसशेतीचे पाणी बंद करून गावाची तहान भागवण्यासाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

अशा प्रकारे आजच्या दुष्काळी परिस्थितीत गावाला जलदूत म्हणून धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यात गावातील तरुण तानाजी डिगे आणि आमोगसिद्ध कोळी हे मोफत ट्रॅक्टर चालवून त्यांना सहकार्य करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!