मध्यवर्ती मिरवणूक मार्गावर प्रशांत इंगळे यांची पदयात्रा, मनसेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रशांत नागनाथ इंगळे यांची सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणूक मार्गावर प्रचार फेरी काढण्यांत आली.
सोन्या मारुती मंदिर- राजवाडे चौक- नवी पेठ चौपाड पंजाब तालीम मल्लिकार्जुन मंदिर – बाळीवेस चौक- बाटी गल्ली- मंगळवार पेठ पोलिस चौकी – सराफ बाजार- मधला मारुती माणिक चौक येथून सोन्या मारुती मंदिराजवळ प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दिन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी, गोविंद बंदपट्टे, सैफन जमखंडी, सुभाष माने, वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शहराध्यक्ष जितू टेंभुर्णीकर, मनविसे शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, यश महिंद्रकर, राहुल अक्कलवाडे, वैभव रंपुरे, आकाश निंबाळकर, गणेश भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.