१ लाख पाणी बॉटल आणि फूड पॅकेट वाटप करणार, वस्तुरूपात मदत करावी कोणासही रोख मदत करू नये, मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबाजवणी करून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढावा व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ही शांतता रॅली ही छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे-पाटील हे मराठ्यांना संबोधित करणार आहेत. तरी या शांतता रॅलीमध्ये शहर जिल्ह्यातील समस्त मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले.
सोलापूर शहरातून निघणाऱ्या शांतता रॅलीस व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील व्यासपीठ मंडपास परवानगी मिळणेसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला आहे. तसेच सदरच्या शांतता रॅलीस ज्या समाज बांधवांना मदत करायची आहे, त्यांनी वस्तुरूपात मदत करावी. परंतु, कोणासही रोख मदत करू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस दिलीप कोल्हे, दास शेळके, अमोल शिंदे, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण, नाना मस्के, श्रीकांत घाडगे, अनंत जाधव, योगेश पवार, शेखर फंड, महेश धाराशीवकर, बाळासाहेब गायकवाड, किरण पवार, राम गायकवाड, संजय शिंदे, शशी थोरात, रवी मोहिते, महेश सावंत, यांसह क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते,