
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला असून एक मेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यात मराठा समाजाची मते कोणाला पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना माऊली पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लोकल चैनल च्या माध्यमातून माझ्यावर आरोप करणारे अमोल शिंदे यांनी समाजाची माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू असे म्हटले.
या विषयावर बोलताना अमोल शिंदे म्हणाले, स्वयंघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून मिरवणारे असे माऊली पवार यांनी जरांगे पाटील सोलापुरात येण्याआधी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवक च्या घरी मीटिंग बोलावून मंगळवेढा रोडवर एका इनोव्हा गाडीमध्ये पैसे घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्या सोबत असणारा गाडीतला माणूस पैसे न मिळाल्याने ही गोष्ट बाहेर आली. समाजाच्या माणसाच्या नावाने पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्यापासून आपण सावध झाले पाहिजे समाजाने ठरवले पाहिजे आपण कुणाच्या पाठीमागे गेले पाहिजे आम्ही म्हणत नाही कुणाला मतदान करावे परंतु जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितले आहे कुणालाही पाठिंबा नाही. अस असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभापाठी समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कधीही गप बसणार नाही.
मला कळालं ते माझ्यावर दावा दाखल करणार खुशाल त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा माझ्याकडे असलेले पुरावे माझ्याकडे पुरेशी आहेत परंतु तुम्ही समाजासमोर यापुढे काय म्हणून जाणार ही मोठी गोष्ट आहे. मराठा समाजाला कुणी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये. मराठा समाजाने अनेक नेते घडवलेत अनेक नेते पाडलेत. स्वयंघोषित मराठा समन्वयकाला मराठा समाज घडला शिकवल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दिलीप कोल्हे, आनंद जाधव, श्रीकांत घाडगे, तुकाराम मस्के, शशी थोरात आणि समन्वयक उपस्थित होते.