“प्रणिती शिंदे यांना मुख्यमंत्री करा”, राहुल गांधी यांच्याकडे मागणी करणार असे म्हणतं खासदार वर्षा गायकवाड यांच्या समाचार कोणी घेतला.?

सोलापूर : प्रतिनिधी
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी स्व पक्षातील महिला यांचे नाव घेता सहयोगी महाविकास आघाडी पक्षातील दोन महिलांची नावे घेत त्या महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात असे वक्तव्य केले याचा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांनी चांगला समाचार घेतला.
यावेळी बोलताना सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे म्हणाले, खासदार वर्षा गायकवाड यांचे मत ऐकल्यानंतर काँग्रेसचा जुना आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वाईट वाटलं कारण काँग्रेस ही कार्यकर्त्यांची खान आहे काँग्रेसमध्ये सोलापूरसह महाराष्ट्र मध्ये अनेक महिला जीवाचं रान करून लढत आहेत.
सोलापूरच्या खासदार आणि मध्य च्या माजी आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रात नव्हे तर लोकसभेमध्ये आपल्या कामाची चुणूक दाखवली. लोकसभेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर राहुल गांधी यांनी देखील अभिनंदन केले. ते महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत. या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे हे विचार पाहिजे असतील तर प्रणिती शिंदे या योग्य मुख्यमंत्रीपदेच्या दावेदार असतील असेही सुनील रसाळे म्हणाले.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या समाचार घेताना रसाळे म्हणाले, ज्यावेळेस वर्षा गायकवाड यांचे तिकीट नाकारले होते त्यावेळेस त्यांनी किती आकडतांडव केला, काय नाही ते बोलले, तुम्हाला मिळालं नाही तर ठीक आणि बाकीच्यांना मिळाला तर मिळू द्यायचं नाही ही जी भूमिका आहे ती योग्य नाही असे म्हणत वर्षा गायकवाड यांचा रसाळ यांनी चांगला समाचार घेतला.
काँग्रेस पक्षातर्फे जर महिला मुख्यमंत्री करायचा असेल तर खासदार प्रणिती शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही. प्रदेश काँग्रेस कमिटी आणि राहुल गांधी यांच्याकडे आम्ही पत्र देणार आहोत आणि जर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना करावे अशी मागणी करणार आहोत असेही सुनील रसाळे म्हणाले.