आबांचा युक्तिवाद विलंबाने दिलेली फिर्याद, सरकार पक्षाच्या विसंगत पुरावा, ॲट्रॉसिटी प्रकरणातून जाधव बंधू निर्दोष

सोलापूर : प्रतिनिधी
वाफळे, ता. मोहोळ येथे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादी सिद्राम शिंदे यास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली या आरोपावरून राजू सदाशिव जाधव व बंडू सदाशिव जाधव यांचे विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, जाधव बंधू हे फिर्यादीच्या घरा जवळील शरद दाढे यांच्या पिठाच्या गिरणीच्या समोर बसलेले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून जाधव बंधूंनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली या आरोपावरून जाधव बंधू विरुद्ध अट्रोसिटी चा खटला न्यायालयात दाखल झाला होता.
सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादात आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये जातीवाचक शिवीगाळ केली असा कोणताही आरोप फिर्यादीने केलेला नाही, केवळ गावच्या राजकारणामुळे तब्बल एक आठवड्यानंतर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हजर असलेले इतर जातीचे त्रयस्थ साक्षीदार यांची साक्ष न्यायालयात घेण्यात आलेली नाही, विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर व सरकार पक्षाच्या विसंगत पुराव्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी आरोपी जाधव बंधूंची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपी जाधव बंधूंतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे, ॲड. प्रणित जाधव, ॲड. श्रीहरी कुरापटी, ॲड. कुमार उघडे यांनी काम पाहिले.