नागपूरच्या भाजपा पदाधिकाऱ्याने महेश कोठे आडम मास्तर यांना समाजाने निवडून देण्याचे केले आवाहन, पद्मशाली अधिवेशन

सोलापूर : प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन घेण्यात आले. यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रमुख उपस्थिती खासदार प्रणिती शिंदे, यांच्यासह मुख्य आयोजक महेश कोठे, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूरचे पद्मशाली समाजाचे नेते तथा भाजप पदाधिकारी, माजी स्थायी समिती सभापती, प्रल्हाद सुरकुटवार यांनी आपले धडाकेबाज भाषण करत पश्चिम महाराष्ट्रातील पद्मशाली समाज बांधवांची मने जिंकली. यावेळी त्यांनी सोलापूर शहरातून पद्मशाली समाजाचे दोन आमदार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे तर मध्य विधानसभा मतदारसंघातून आडम मास्तर यांना पद्मशाली समाज बांधवांनी बहुसंख्य मतदान करून निवडून आणावे असे आवाहन केले.
प्रल्हाद सुरकुटवार हे भाजपाचे नागपूर येथील प्रमुख पदाधिकारी असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उत्तर विधानसभा इच्छुक उमेदवार महेश कोठे तर महाविकास आघाडीतील शहर मध्य चे इच्छुक उमेदवार नरसय्या आडम यांना निवडून आणण्याचे आव्हान पद्मशाली बांधवांना केले. यावेळी प्रल्हाद हे भाजपाचे असून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन पद्मशाली समाजाला केल्याने अधिवेशनात त्यांच्याच भाषणाची चर्चा सुरू होते.