जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान बौद्धिक व्याख्यान माला
सुबोध भावे, शैलेन्द्र देवळाणकर, भाऊ तोरसेकर व डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची व्याख्यान होणार

सोलापूर : प्रतिनिधी
गणेशोत्सवा निमित्त जनता बैंक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे बौद्धिक व्याख्यानमाला शुक्रवार 13 सप्टेंबर 2024 ते सोमवार 16 सप्टेंबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्याख्यानमालेचे यंदाचे 48 वे वर्ष आहे.
जनता बैंक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची बौद्धिक व्याख्यानमाला हुतात्मा स्मृतिमंदिर सोलापूर महानगरपालिका येथे दररोज सायंकाळी 7.00 वाजता होणार आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 13/09/2024 रोजी सायंकाळी 7.00 वाजता पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प सुबोध भावे सिने कलाकार, नाट्य रंगभूमि कलाकार है गुंफणार आहेत. याची “प्रकट मुलाखत” सोलापूर आकाशवाणी निवेदिका मंजूषा गाडगीळ या घेणार आहेत. शनिवार 14 सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प संचालक उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन डॉ शैलेन्द्र देवळाणकर हे गुंफणार आहेत. यांचे ‘विकसित भारताची उद्दीस्टे आणि शिक्षणाची भूमिका या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार 15 सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे गुंफणार आहेत. यांचे “कायदा, व्यवस्था आणि लोकशाही” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सोमवार 16 सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प माजी आयुक्त भूषणकुमार उपाध्याय हे गुंफणार आहेत. यांचे “ताण तणाव व मानसिक समस्या” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी बँकेचे सर्व सभासद, खातेदार, हित चिंतक व सोलापूर येथील सर्व रसिकानी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून अभ्यासू व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस बँकेचे मा. अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कुलकर्णी, तज्ञ संचालक अॅड. प्रदिपसिंग राजपूत संचालक जगदीश भुतडा, पुरुषोत्तम ज्ञानेश्वर उडता, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी बँकेचे सरव्यवस्थापक बुट्टे, उप-सरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, बँकेचे सहा. सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, सहा. सरव्यवस्थापक मकरंद जोशी मंडळाचे विशस्त मुकुंद कुलकर्णी, नागेश गुणके, सौ. पूजा कामत, जयवंत कोकाटे, मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार, उपाध्यक्ष सौ प्र.ती चौहान, सचिव नामदेव यलगोंडा, खजिनदार सुहास कमलापूरकर, व्याख्यानमाला प्रमुख मदन मोरे व बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.