माकप च्या मध्यवर्ती कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उदघाटन, पैशाला नाही प्रमाणिक पणाला मत द्या : अशोक इंदापूरे

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची धमक असणारे आडम मास्तर आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत जाणकार अभ्यासू , अनुभवी आमदार म्हणून ते काम पाहिलेले आहेत. ते अहोरात्र समाजातल्या प्रत्येक माणसासाठी झगडणारा आणि जगणारा आपला माणूस आहे. तेव्हा या विधानसभा निवडणुकीत धर्मांध भाजप पक्षाचे उमेदवार देवेंद्र कोठे, काँग्रेस चे चेतन नरोटे, आणि एम.आय.एम चे फारूक शाब्दी या मतदार संघात पैशाचा पाऊस पाडतील त्या खोट्या आश्वासना बळी न पडता प्रमाणिक पणाला मत द्या. असे आवाहन अशोक इंदापूरे यांनी केले.
मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन वाहतूक संघटनेचे नेते रियाज सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्याचे नेते अशोक इंदापूरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कॉ.नरसय्या आडम मास्तर हे सभेला संबोधित करताना म्हणाले की, मी तमाम सोलापूर जनतेच्या हितासासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी उभा आहे. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवून लोकसभेत पाठवले ते आपल्याशी विश्वासघात केले याचा बदला घेण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी पक्षाचे नेते युसुफ मेजर, इरफान सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर कामनी आडम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख,शेवंता देशमुख,सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, दिनेश घोडके, अकील शेख,नरसिंह म्हेत्रे,अशोक तांबोलु, विश्वनाथ म्हेत्रे, देवीदास कुमार, हाफिज अबूबकर, रमेश चक्राल , अनिल लिंबोले, अजीज पटेल, नरसय्या कंदुल, म.हनीफ सातखेड, अब्राहम कुमार, शंकर म्हेत्रे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव ॲड एम एच शेख यांनी केले. सूत्रसंचालन ॲड.अनिल वासम यांनी तर आभार बापू साबळे यांनी केले.